रागाच्या भरात तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण

रागाच्या भरात तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण

रागाच्या भरात तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण 

पिंपरी,  ता. २ - वाल्हेकरवाडी परिसरात एका तरुणावर लाकडी दांडक्याने हल्ला करून जखमी केल्याप्रकरणी तसेच दुचाकी व घरातील साहित्याची तोडफोड केल्याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत बालु सोनाजी इंगळे (वय २८ वर्ष, व्यवसाय बिगारीकाम रा. रामकृष्ण बंगल्याच्या पाठीमागे दत्त मंदिर सायली कॉम्पलेक्स वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना २७ मे रोजी रात्री साडे अकरा वाजता सावित्रीबाई कॉलनी येथे घडली.

या प्रकरणी आरोपी आकाश शरद मोरे (वय २६, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड)  याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.

तक्रारीनुसार, आरोपी हा मद्यधुंद अवस्थेत फिर्यादीच्या भावाची दुचाकी फोडत होता. त्यास विरोध केल्याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाला. तसेच आरोपीने दुचाकी, घरातील दूरदर्शन संच आणि कपाटाची काच फोडून नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३२४(४), ३५२ तसेच संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories