news
clock

'भाजप'च्या पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्षपदी संजय पटनी यांची नियुक्ती

पिंपरी, ता. ६ - भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्षपदी  निष्ठावंत कार्यकर्ते संजय पटनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी संजय पटनी यांना नियुक्तीपत्र दिले. 

पिंपरी-चिंचवड भाजपच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयात हा समारंभ झाला. यावेळी पक्षाचे संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस विकास डोळस, मधुकर बच्चे यांच्यासह अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. “निष्ठावंत कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला” अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. 

संजय पटनी यांच्यासोबतच पक्षाने इतरही महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर केल्या. यामध्ये क्रीडा प्रकोष्ट शहराध्यक्ष राष्ट्रीय खेळाडू अरुण पाडुळे, दिघी-गवळीनगर-गव्हाणेवस्ती मंडलाध्यक्ष  प्रमोद परदेशी, चिखली-कृष्णानगर मंडलाध्यक्ष अजय साने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

नवनियुक्त पदाधिकारी खंबीरपणे काम करतील......

''भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. संजय पटनी यांच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला वरिष्ठ उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन पक्षाने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. आगामी काळात पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ‘शेवटच्या घटकाचा विकास’ ही संकल्पना तळागाळापर्यंत नेण्यासाठी हे सर्व नवनियुक्त पदाधिकारी खंबीरपणे काम करतील, असा मला विश्वास आहे.''

– आमदार महेश लांडगे 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories