news
clock
संत तुकाराम बीज सोहळ्यासाठी 'पीएमपीएमल'चे जादा गाड्यांचे नियोजन

संत तुकाराम बीज सोहळ्यासाठी 'पीएमपीएमल'चे जादा गाड्यांचे नियोजन

संत तुकाराम बीज सोहळ्यासाठी 'पीएमपीएमल'चे जादा गाड्यांचे नियोजन

पिंपरी, ता. २ - संत तुकाराम बीज सोहळा देहूगावमध्ये ५ मार्चला होणार आहे.  या सोहळ्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) ४, ५ व ६ मार्चला  देहूगांव व आळंदीसाठी  नियमित मार्गांच्या ३४ बसेस व जादा १२५ बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे.

 महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच पुणे व पिंपरी चिंचवड शहर व उपनगरांतून देहूगाव येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पीएमपीएमएल कडून जादा बसेसची व्यवस्था नियमित तिकीट दराने करण्यात आलेली आहे. या गाड्या स्वारगेट, मनपा भवन, हडपसर, पुणे स्टेशन, आळंदी येथून सुटणार आहेत. 

 देहूगाव येथून परतीच्या प्रवासासाठी देहूगाव येथील झेंडे मळ्याजवळील सैनिकी मैदानावरून बसेसची व्यवस्था तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे देहूगाव ते आळंदी ये-जा करण्याकरीता गाथा मंदिराजवळ असलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज क्रिडांगणाजवळील मोकळ्या जागेतून जादा बसेस सोडण्यात येतील.

भाविकांनी बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन 'पीएमपीएमएल'कडून करण्यात आले आहे. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories