संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर, ७ जुलैला देहूतून पंढरपूरला प्रस्थान, ८ जुलैला पिंपरी-चिंचवडमध्ये होणार आगमन

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर, ७ जुलैला देहूतून पंढरपूरला प्रस्थान, ८ जुलैला पिंपरी-चिंचवडमध्ये होणार आगमन

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर, ७ जुलैला देहूतून पंढरपूरला प्रस्थान, ८ जुलैला पिंपरी-चिंचवडमध्ये होणार आगमन 

पुणे, ता. ४ - आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सात जुलै रोजी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. २४ जुलैला सोहळा पंढरपुरात दाखल होईल, अशी माहिती संत तुकाराम महाराज संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. 

यावेळी पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह महाराज मोरे, संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख लक्ष्मण महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, विश्वस्त दिलीप महाराज मोरे आदी उपस्थित होते. संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने पालखी रथ आणि चौघडा वाहनास जुंपण्यासाठी तीन बैलजोडींची खरेदी केली जाणार आहे. नवीन चांदीच्या रथाचे काम सुरु आहे, असेही पालखी सोहळा प्रमुख मोरे यांनी सांगितले.

विक्रमसिंह महाराज मोरे यांना सांगितले की, सात जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास पालखी सोहळ्याचे देहूतील देऊळवाड्यातून प्रस्थान होईल. पहिल्या दिवशी पालखीचा मुक्काम देहूतील इनामदार वाड्यात असणार आहे. ८ जुलै रोजी पालखीचा इनामदारवाड्यातून मार्गस्थ होईल, दुपारनंतर पालखी सोहळ्याचे निगडी येथे आगमन होईल आणि रात्रीचा मुक्काम आकुर्डीत असेल. ९ जुलै रोजी सोहळा पिंपरी, कासारवाडीमार्गे पुण्यात नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दोन दिवस मुक्कामी असेल. 

११ जुलैला हडपसरमार्गे लोणीकाळभोर येथे कदमवाकवस्ती नवीन पालखी तळावर पालखीचा मुक्काम असेल. पुढे, पालखीचा मुक्काम १२ जुलैला यवतमध्ये, १३ जुलैला वरवंडमध्ये, १४ जुलैला उंडवडी गवळ्याची येथे, १५ जुलैला बारामतीत आणि १६ जुलैला सणसर येथे असेल. काटेवाडी येथे मेंढ्याचे रिंगण होईल. १७ जुलै रोजी बेलवाडीत सोहळ्यातील पहिले गोल रिंगण होईल. त्यानंतर पालखी निमगाव केतकीत मुक्काम करेल.

१८ जुलैला इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण होईल व तेथे पालखीचा मुक्काम असेल. १९ जुलैला सराटी येथे पालखीचा मुक्कामअसेल. २० जुलैला सोहळ्यातील नीरा स्नान पार पडले व अकलूज येथे तिसरे गोल रिंगण होईल. २१ जुलैला माळीनगर येथे पहिले उभे रिंगण होऊन पालखी सोहळा बोरगावला मुक्काम करणार आहे.  २२ जुलैला दुपारी तोंडले बोंडले येथे धावा होईल व पिराची कुरोली येथे पालखी मुक्काम करेल. २३ जुलैला वाखरीजवळील बाजीराव विहीर येथे दुसरे उभे रिंगण होईल. त्यानंतर वाखरीत पालखीचा मुक्काम असेल. २४ जुलै रोजी पादुका अभंग आरती, उभे रिंगण झाल्यानंतर सोहळा पंढरपुरातील संत तुकाराम महाराजांच्या नवीन मंदिरात मुक्कामासाठी जाईल. २५ जुलैला आषाढी एकादशी साजरी होईल. 





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories