महापालिका विकसित करणार .... 'सारथी - स्मार्ट गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म'
पिंपरी, ता. १८ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'सारथी' प्रणाली अधिक कार्यक्षम व प्रभावी करण्यासाठी 'सारथी 2.0' - 'स्मार्ट गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म' विकसित होणार आहे. त्यासाठीचे पत्र महापौर रवी लांडगे यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिले आहे. 'स्मार्ट गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म'मध्ये AI आधारित तक्रार वर्गीकरण, Predictive Analytics आणि Chatbot सुविधा समाविष्ट कराव्यात. यासाठी ६० दिवसांत सुधारित प्रणालीचा कृती आराखडा सादर करावा, असे निर्देश दिले आहे.
तक्रारींचे स्वयंचलित वर्गीकरण व योग्य विभागाकडे त्वरित पाठविणे, ‘Resolved’ स्थितीपूर्वी प्रत्यक्ष पडताळणी (Field Verification) अनिवार्य करणे, तक्रारींवर मूळ कारण विश्लेषण (Root Cause Analysis – RCA) करून कायमस्वरूपी उपाययोजना, विभागनिहाय अधिकाऱ्यांची माहिती प्रणालीत समाविष्ट करणे, प्रभावी UI/UX सुधारणा आणि नागरिकांसाठी सुलभ वापर, सर्व सेवांसाठी स्पष्ट Service Level Agreement (SLA) निश्चित करणे, डेटा सुरक्षा व Disaster Recovery प्रणाली अधिक सक्षम करणे या बाबी सुधारीत प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याचे महापौरांनी सांगितले आहे.
महापौर रवी लांडगे म्हणाले, ''सारथी ही केवळ तक्रार नोंदणी प्रणाली नसून ती नागरिक आणि प्रशासन यांच्यातील विश्वासाचे दुवा आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नागरिकांना जलद, पारदर्शक आणि परिणामकारक सेवा देणे हे महापालिकेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.‘सारथी 2.0’ च्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका डिजिटल सुशासनाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत असून, नागरिकांना अधिक जलद आणि दर्जेदार सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.''