काम करताना दुसऱ्या मजल्यावरुन पडून बांधकाम मजूराचा मृत्यू

काम करताना दुसऱ्या मजल्यावरुन पडून बांधकाम मजूराचा मृत्यू

काम करताना दुसऱ्या मजल्यावरुन पडून बांधकाम मजूराचा मृत्यू 

पिंपरी, ता. १६ - बांधकाम साईटवर काम करत असताना दुसऱ्या मजल्यावरुन पडून गंभीर जखमी होऊन कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना ३ फेब्रुवारीला रावेत येथे घडली आहे. या घटनेतील आरोपी बांधकाम व्यावसायिकांवर रविवारी (ता. १५) रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

याबाबत, मृत कामगार चंद्रकांत तेजु जाधव (वय ३६ वर्षे) यांच्या पत्नीने रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रावेत येथे ईस्कॉन मंदिरा शेजारी नवीन बांधकाम सुरु आहे. तेथे दुसऱ्या मजल्यावर विटांचे बांधकाम करीत असताना जाधव तेथून खाली पडल्याने गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. 

 सदर बांधकामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्ट्रीने कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केलेल्या नव्हत्या. कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे श्रीकृष्ण रेसेडन्सीचे बांधकाम व्यावसायिक १) प्रवीण यल्लमार (रा. कृष्णानगर) व २) तेजस लखानी (रा. इंद्रायणी नगर, भोसरी) या आरोपींवर पोलिसांनी 

भारतीय न्याय संहीता कलम १०६ (१), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अद्याप अटक केलेली नाही.

--------------------------------------------------------------------------------------------

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories