news
clock
प्रकृती अस्वास्थ्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल

प्रकृती अस्वास्थ्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल

पिंपरी, ता. २२ - ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना रविवारी (ता. २२) पुण्यातील रुबी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अशक्तपणामुळे त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  शरद पवार यांना शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने अशक्तपणा जाणवत होता.  त्यामुळे त्यांना रुबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे. सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर ट्विट करत पवारांच्या तब्येतीची माहिती दिली. आम्ही बाबांना पुढील चाचण्या आणि हायड्रेशनसाठी पुण्यातील रुबी हॉलमध्ये दाखल करत आहोत असं त्यांनी सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी खोकल्याच्या त्रासामुळे शरद पवारांना बारामतीहून पुण्यात उपचारासाठी आणले होते. रुबी हॉल रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून ५ दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला होता. पुढील काही दिवस घरी विश्रांती घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला. नियमित औषधोपचार सुरु ठेवण्याच्या सूचनाही डॉक्टरांनी दिल्या होत्या. परंतु, पुन्हा शरद पवारांच्या प्रकृतीत बिघाड झाला आहे. डॉक्टरांचे पथक त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories