गहाण ठेवलेले सोने परत सोडवून न देता  ५ लाखांची फसवणूक, चिंचवडमधील प्रकार

गहाण ठेवलेले सोने परत सोडवून न देता ५ लाखांची फसवणूक, चिंचवडमधील प्रकार

 गहाण ठेवलेले सोने परत सोडवून न देता  ५ लाखांची फसवणूक, चिंचवडमधील प्रकार

पिंपरी, ता. 21- बँकेत गहाण ठेवलेले सोने  परत सोडून देण्यासाठी 5 लाख 10 हजार रुपये घेतले. मात्र सोने सोडवून दिले नाही. ही फसवणूक 15 मे 2026 ते 20 मे 2026 या  चिंचवड स्टेशन येथील जनता सहकारी बँकेत घडली.

या प्रकरणी सुजितकुमार काकासो भोसले (वय ४० वर्ष, व्यवसाय, रा. आंबेगांव पठार) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.आरोपी प्रशांत मोहन गायकवाड (अंदाजे वय ३५ वर्ष, रा. खेड राजगुरूनगर) हा अटक आहे.

आरोपी गायकवाड याने फिर्यादी भोसले यांना   त्यांचे बँकेत गहाण ठेवलेले ६० ग्रॅम सोने सोडवून ताब्यात घेण्यासाठी कर्जाची रक्कम ५,१०,०००/- रूपये घेऊन येण्यासाठी सांगितले. भोसले यांच्यासोबत सदर व्यवहाराचे लेखी करार केला. भोसले यांचा विश्वास संपादन करुन त्यांना सदरची रक्कम आरोपी गायकवाडने जनता सहकारी बँकेमध्ये असलेल्या स्वतःच्या खात्यावर  भरण्यास भाग पाडले. पण,  गहाण ठेवलेले सोने न सोडविता परस्पर बँकेतून निघून जाऊन फिर्यादी भोसले यांची फसवणूक केली आहे. 

आरोपी विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories