फिरायला आलेल्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमधील एका युवक-युवतीचा शिरोता धरणात बुडून मृत्यू

फिरायला आलेल्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमधील एका युवक-युवतीचा शिरोता धरणात बुडून मृत्यू

फिरायला आलेल्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमधील एका युवक-युवतीचा शिरोता धरणात बुडून मृत्यू

पिंपरी, ता. १८ - लोणावळ्याजवळील शिरोता धरण परिसरात फिरायला आलेल्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमधील एक युवक-युवती रविवारी (ता. १७) धरणाच्या पाण्यात बुडून मरण पावले.  करण ज्ञानदेव ठोंबरे (वय २० वर्षे, रा. बालाजीविहार, कोडोली, सातारा) आणि आर्या सुशांत बंडावार (वय २० वर्षे, मूळ रा. गोंदिया) अशी मृतांची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थ्यांचा मित्र सुजल प्रकाश पवार (वय १९ वर्षे) याने कामशेत पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. रविवारी (ता. १७) सकाळी ७ च्या सुमारास  करण ठोंबरे, आर्या बंडावार, आस्था टेंबरे, सुष्टी गवाडे, ज्योत्सना जेळके व सुजल पवार हे ६ जण  राजमाची किल्ला येथे फिरण्यासाठी दोन दुचाकी आणि दोन स्कूटीवरुन आले होते. तिथे पोचल्यानंतर त्यांनी शिरोता धरण परिसरात जाण्याचे ठरवले.

दुपारी १२ च्या सुमारास सगळे धरणाच्या बॅकवॉटर परिसरात पोहोचले. पाण्यात पाय सोडून गप्पा मारत असताना आर्या व ज्योत्स्ना ''येथे गढूळ पाणी आहे, आपण पुढे जाऊ" असे म्हणत पुढे गेल्या आणि काही वेळातच ज्योत्स्नाचा "वाचवा, वाचवा", असा ओरडण्याचा आवाज आला. ज्योत्स्ना ही आर्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होती. मात्र, तिचा हात पोचत नव्हता. करणने पाण्यात उडी मारली, पण त्यालाही पोहता येत नव्हते. त्यामुळे आर्या व करण पाण्यात बुडू लागले. सुजलनेही पाण्यात उडी मारुन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, इतर पर्यटकांनीही मदतीचा प्रयत्न केला. पण, उपयोग झाला नाही. 

तेव्हा, उपस्थितांच्या मदतीने या मित्रांनी 'डायल १००' नंबरवर फोन करुन पोलिसांना बोलावले. कामशेत पोलिस, वन्यजीव रक्षक मावळ संस्था आपत्ती व्यवस्थापन पथक, शिवदुर्ग मित्र लोणावळा यांचे बचाव पथक तत्काळ घटनास्थळी पोचले. शोधमोहीम राबवून आर्या व  करणला पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यानंतर तातडीने रुग्णवाहिकेतून  कामशेत येथील महावीर हॉस्पिटल येथे नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.   कामशेत पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक आकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार हवालदार हिप्परकर यांनी या घटनेची नोंद केली.  

मदतकार्यात सहभागी - निलेश गराडे, महेश मसने, भास्कर माळी, अगोल सुतार, विनय सानंत, कुणाल कडू, गणेश गायकवाड, राजेंद्र कडू, कुन्दन भोसले, सागर लोकरे, अनिश गराडे, अभिजित बोस्कर, सतिष संगर, नितीन सांगडे, सुनील गायकवाड, लक्ष्मण नायकबार आणि DATA पथक 





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories