इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया पिंपरी-चिंचवड शाखेच्या अध्यक्षपदी सीए महावीर अशोक कोठारी यांची निवड
Mar 09 2026
32
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया पिंपरी-चिंचवड शाखेच्या अध्यक्षपदी सीए महावीर अशोक कोठारी यांची निवड
पिंपरी, ता. ९ - दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया पिंपरी-चिंचवड शाखेच्या अध्यक्षपदी सीए महावीर अशोक कोठारी यांची निवड करण्यात आली आहे. निगडी येथील दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेच्या कार्यालयात नुकत्याच घेण्यात आलेल्या निवडणुकीत त्यांची निवड जाहीर करण्यात आली. संस्थेचे मावळते अध्यक्ष वैभव मोदी यांच्याकडून "सीए कोठारी" यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.
संस्थेच्या कार्यकारिणीचीही निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणीमध्ये नियुक्त केलेल्या इतर पदाधिकाऱ्यांमध्ये मनोज मालपाणी (उपाध्यक्ष), सारिका चोरडिया (सचिव), धीरज बलदोटा (खजिनदार तथा सीए विद्यार्थी संघटना अध्यक्ष), समिती सदस्य शैलेश बोरे, सचिन ढेरंगे यांचा समावेश आहे.
संस्थेच्या वतीने सीए सदस्य आणि विद्यार्थ्यासाठी कार्यंशाळा आयोजन करण्यात येणार आहे. सर्व सामान्य नागरिक, व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक यांच्यामध्ये कर विषयक जागृती होणे आवश्यक आहे. त्यासाठी कर विषयक ज्ञान प्रसार, परिसंवाद, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि इतर समाज उपयोगी उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहे, अशी माहिती नवनियुक्त अध्यक्ष कोठारी यांनी दिली.