आयुक्तांची भेट मिळाली नाही तर त्यांचा पाठलाग करुन नागरिकांच्या समस्यांचे गाऱ्हाणे मांडू - शिवसेना शहराध्यक्ष चेतन पवार

आयुक्तांची भेट मिळाली नाही तर त्यांचा पाठलाग करुन नागरिकांच्या समस्यांचे गाऱ्हाणे मांडू - शिवसेना शहराध्यक्ष चेतन पवार

आयुक्तांची भेट मिळाली नाही तर त्यांचा पाठलाग करुन नागरिकांच्या समस्यांचे गाऱ्हाणे मांडू - शिवसेना शहराध्यक्ष चेतन पवार

पिंपरी, ता. १५ - ''येत्या चार दिवसांत  आम्हाला महापालिका आयुक्तांची भेट मिळाली नाही तर आयुक्त जिथे जिथे जातील तिथे त्यांचा पाठलाग करुन नागरिकांच्या समस्यांचे गाऱ्हाणे मांडण्यात येईल.  नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास 'पाठलाग आंदोलन' येणाऱ्या काळात आणखी तीव्र करण्यात येईल.'', असा इशारा शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) शहराध्यक्ष चेतन पवार यांनी नुकताच दिला आहे. 

पवार म्हणाले की, ''शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न सुरू आहेत.  याबाबत वारंवार पत्रव्यवहार देखील करण्यात आला होता. अनेक प्रश्नांवर तक्रार निवारणासाठी आयुक्तांकडे वेळ मागितली होती. मात्र, प्रत्येक वेळी काही ना काही कारण देत भेट टाळली. 

ताथवडे येथील सर्वे नं. ६४ च्या नाल्याचा प्रश्न, ताथवडे येथील जिल्हा परिषद शाळा महानगरपालिकेत समाविष्ट करण्याचा मुद्दा, दापोडी येथील क्रीडांगण, वाल्हेकरवाडी येथील पाणीटंचाई, पिंपरी येथील मंडईतील अतिक्रमण, स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांबाबत आयुक्तांशी चर्चा करायची होती.''

आयुक्त भेटत नसल्याने संतप्त शिवसैनिकांनी थेट आयुक्तांच्या केबिनसमोर जाऊन घोषणाबाजी करत घेराव घातला. या प्रकारामुळे काही काळ महापालिकेत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.  प्रशासन नागरिकांच्या प्रश्नांबाबत उदासीन असल्याची टीका शिवसैनिकांनी केली आहे. या आंदोलनात अनिता तुतारे, रोमी सिंधू, तुषार नवले, कैलास नेवासकर, युवराज कोकाटे, सतीश मरळ, श्रीमंत गिरी, विशाल चव्हाण, गोरखनाथ पाटील, संदीप मालके, डॉ. दत्ता शेटे, योगेश पवार, वैभवी घोडके, कल्पना शेटे, ज्योतीताई भालके, तसलीम शेख व इतर शिवसैनिक पदाधिकारी सहभागी झाले.

आयुक्त हे ‘पळकुटे कारभारी’ 

''आमच्या पक्षाला वारंवार वेळ मागूनही भेट दिली जात नाही. मात्र, भाजप पदाधिकाऱ्यांना तत्काळ वेळ देऊन त्यांच्या समस्या ऐकल्या जातात. हा स्पष्ट दुजाभाव आहे. शहरातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आम्ही येतो, तरीही आम्हाला दुर्लक्षित केले जाते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडचे कारभारी आयुक्त हे ‘पळकुटे कारभारी’ असल्याचेच दिसून येते.'' -  शिवसेना शहराध्यक्ष चेतन पवार


 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories