मोशी कचरा डेपो दुर्घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, शिवसेनेच्या नगरसेवकांची मागणी, केले ठिय्या आंदोलन

मोशी कचरा डेपो दुर्घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, शिवसेनेच्या नगरसेवकांची मागणी, केले ठिय्या आंदोलन

मोशी कचरा डेपो दुर्घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, शिवसेनेच्या नगरसेवकांची मागणी, केले ठिय्या आंदोलन 

पिंपरी, ता. १० जुलै २०२६ - मोशी कचरा डेपो दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या प्रत्येक अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तत्काळ अटक झालीच पाहिजे. या मागणीसाठी आज शुक्रवारी (ता. १०) शिवसेनेच्या (शिंदे) नगरसेवकांनी  महापालिका आयुक्त दालनात ठिय्या आंदोलन केले. 


प्रशासनाविरोधात आयुक्तांच्या कार्यालयात घोषणाबाजी केली. पर्यावरण विभागाचे मुख्य अधिकारी  संजय कुलकर्णी यांच्यासह सर्व दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करा. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांना कोणतीही माफी नाही. मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे आणि भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका नगरसेवकांनी घेतली. 


मोशी कचरा डेपो दुर्घटना ही केवळ दुर्घटना नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झालेली मनुष्यहत्या आहे. त्यामुळे या घटनेला जबाबदारांना शिक्षा झाल्याशिवाय आमचा न्यायासाठी संघर्ष थांबणार नाही, असेही यावेळी नगरसेवकांनी ठणकावून सांगितले आहे.


नगरसेविका सुलभा उबाळे यांनी या दुर्घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन पाठवले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,  मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेला पुर्णपणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी हे जबाबदार आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प बंद आहे. त्यामुळे कचऱ्याचे ढिग वाढले, आत्तापर्यंत बायोमायनिंग टप्पा-१, टप्पा-२ मध्ये शेकडो कोटींच्या निविदा काढण्यात आल्या. परंतू कचऱ्यांचे डोंगर वाढतच गेले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पर्यावरण विभागाला फक्त निविदा काढणे, पुन्हा देखभाल दुरुस्तीसाठी निविदा काढणे यामध्येच रस असल्याचे दिसून येते. या विभागात भरपूर प्रमाणात भ्रष्टाचार असल्याने त्या विभागाची सखोल चौकशी व्हावी.

तसेच आत्तापर्यंत मोशी कचरा डेपो मध्ये अनेक प्रकल्प राबविले आहेत. त्यापैकी अनेक बंद सुध्दा पडले आहेत, यासाठी पिंपरी चिंचवड मनपाचे हजारो कोटी रूपये वाया गेले आहेत. हा भ्रष्टाचार थांबविण्यासाठी आपण स्वतः लक्ष घालावे व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.

 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories