मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी शिवसेनेचे महापालिकेत कचरा ओतून आंदोलन
पिंपरी, ता. १५ जुलै २०२६ - मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी बुधवारी (ता. ८) शिवसेनेने (शिंदे) महापालिका भवनाच्या पायऱ्यावर कचरा ओतून आंदोलन केले. महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली.
आंदोलकांनी संजय कुलकर्णी यांच्या प्रतिमेला नोटांचा हार घालून निषेध व्यक्त केला. मोशी कचरा डेपो दुर्घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने केली. संजय कुलकर्णी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
नगरसेवक सुलभा उबाळे, ऐश्वर्या तरस, विश्वजीत बारणे, राजेंद्र तरस, चेतन बेंद्रे, बापू कातळे व पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.