किरकोळ कारणाने खाद्यपदार्थ विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला, जाधववाडी-चिखलीतील घटना
Apr 10 2026
89
किरकोळ कारणाने खाद्यपदार्थ विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला, जाधववाडी-चिखलीतील घटना
पिंपरी, ता. १० - जाधववाडी-चिखली परिसरात किरकोळ संभाषणाच्या रागातून खाद्यपदार्थ विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
याबाबत, बब्रुवान सुभाष सूर्यवंशी (वय ३८ वर्ष, रा. जाधववाडी, चिखली) यांनी तक्रार दिली आहे. आरोपी मंगेश ज्ञानेश्वर मांडगे (वय-२२ वर्ष रा दत्तनगर) याला अटक केली आहे.
फिर्यादी बब्रुवान सुभाष सूर्यवंशी हे जाधववाडी शिलानंद किराणा जनरल स्टोअर्स येथे गेले होते. तेथे सूर्यवंशी यांचा नियमीत ग्राहक असलेला आरोपी मंगेश दिसला व सूर्यवंशी यांनी त्याला मेजेने 'काळया' म्हणून आवाज दिला. त्यामुळे राग आलेल्या मंगशने त्याच्या जवळ असलेला लोखंडी कोयता फिर्यादीच्या डोक्यात मारला. यात फिर्यादी सूर्यवंशी गंभीर जखमी झाले.
या प्रकरणी गुरुवारी (ता. ९) आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(२) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.