मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष कार्यान्वित

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष कार्यान्वित

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष कार्यान्वित

पिंपरी, ता. १७ जुलै २०२६ - भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रम दिनांक २० जून २०२६ पासून सुरू असून हा कार्यक्रम प्रभावी व सुरळीतपणे राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष  कार्यान्वित केले आहेत. पुणे जिल्हा माहिती कार्यालयाने ही माहिती दिली आहे.

मतदारांना पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत आवश्यक माहिती, मार्गदर्शन तसेच अडचणींचे निराकरण करण्यासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनी अथवा ई-मेलद्वारे संपर्क साधता येणार आहे. ग्रामीण भागातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर व मावळ या विधानसभा मतदारसंघांसाठी श्रीमती सुरेखा माने, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. ११), जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक १९५० तसेच [email protected] हा ई-मेल उपलब्ध करून देण्यात आला आहे.

चिंचवड, पिंपरी व भोसरी या विधानसभा मतदारसंघांसाठी सचिन पवार, उपआयुक्त, निवडणूक विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याशी ८८८८००६६६६ या क्रमांकावर किंवा [email protected] या ई-मेलवर संपर्क साधता येईल. वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कँटोन्मेंट आणि कसबा पेठ या विधानसभा मतदारसंघांसाठी श्रीमती प्राची कचरे, महापालिका सहाय्यक आयुक्त, पुणे महानगरपालिका या समन्वय अधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांच्याशी ०२०-२५५०६६४९ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा [email protected] या ई-मेलवर संपर्क साधता येईल.

मतदारांनी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून मतदार यादीतील आवश्यक दुरुस्त्या, माहिती अद्ययावत करणे अथवा इतर बाबींकरिता संबंधित मदत कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories