बालाजी नगर मेदनकरवाडीतील बांधकाम दुर्घटना, कामगाराचा मृत्यू
पिंपरी, ता. ३ - चाकण दक्षिण पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (ता. २) बालाजीनगर-मेदनकरवाडी येथे एका बांधकाम साईटवर स्लॅब तुटल्याने चौथ्या मजल्यावरुन पडून मजूराचा मृ्त्यू झाला आहे. ठेकेदाराला पोलिसांनी अटक केली आहे.
रितलाल झावल महतो (वय ६०, मजूरी, आगरकरवाडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी ठेकेदार आरविंद शारवाले (रा. बालाजीनगर, मेदनकरवाडी) याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शारवाले याच्या मालकीच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर काम करत असताना सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्यामुळे कामगार नुनुचंद नेहाल महतो (वय ४६) यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.
फिर्यादीने सांगितले की, आरोपीला उंचावर काम करताना सेफ्टी बेल्ट, हेलमेट, झुला किंवा इतर कोणत्याही सुरक्षा साधनांचा वापर करणे आवश्यक असल्याचे ठाऊक असूनही, कामगारांना ही साधने पुरवली गेली नाहीत. त्याच्या परिणामी बांधकामाचा स्लॅब खाली पडला आणि ननचंद नेहाल महतो यांचा अपघाती मृत्यू झाला. या प्रकरणी चाकण दक्षिण पोलिस ठाण्यात कलम १०५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.