news
clock
पुणे विद्यापीठात लवकरच 'स्कूल ऑफ अंडरग्रॅज्युएट स्टडीज' सुरु होणार,  कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांची माहिती

पुणे विद्यापीठात लवकरच 'स्कूल ऑफ अंडरग्रॅज्युएट स्टडीज' सुरु होणार, कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांची माहिती

पुणे विद्यापीठात लवकरच 'स्कूल ऑफ अंडरग्रॅज्युएट स्टडीज' सुरु होणार,  कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांची माहिती 

पुणे, ता. २८ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच 'स्कूल ऑफ अंडरग्रॅज्युएट स्टडीज' सुरु होणार आहे. यामध्ये बी. ई. व बी. टेक. अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी भारतीय अंतराळ  या विषयातील एक अभ्यासक्रम लवकरच सुरु होईल, अशी माहिती कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांनी अधिसभेत दिली. 

विद्यापीठाची अधिसभा शुक्रवारी (ता. २७) सुरु झाली. विद्यापीठाचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प शनिवारी (ता. २८) अधिसभेत सादर करण्यात येणार आहे.  डॉ. गोसावी म्हणाले, ''विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये उच्च दर्जाचे संशोधन आणि पेटंटसाठीचे प्रयत्न सुरु आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार विद्यापीठांमधील विभागांतर्गत फ्रेमवर्क रॅकिंग करण्यात येईल. त्याअंतर्गत विविध विभागांना बळ देण्यासाठी 'विभाग शाश्वत संशोधन अनुदान' योजना सुरु केली जाईल. विभागांच्या रँकिंगनुसार त्या-त्या विभागांना दहा, आठ, सहा, चार, दोन लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाईल.'' 

" विद्यापीठाच्या यंदाच्या अर्थसंकल्पात संशोधन आणि संवर्धन योजनेवर भर दिला आहे. अध्यापक आदानप्रदान उपक्रमात आशियाई देशातील काही प्राध्यापक आपल्याकडे येतील आणि आपले काही प्राध्यापक दोन ते आठ आठवड्यांसाठी तिकडे जातील. 'आंतरराष्ट्रीय अतिथी विद्याशाखा योजना' राबविण्याचे विचाराधीन आहे. यात जागतिक दर्जाच्या आघाडीच्या विद्यापीठांमधील संशोधनात योगदान असणाऱ्या प्राध्यापकांचा समावेश असेल. नवीन अभ्यासक्रमांची रचना करण्यासाठी व संशोधनात विद्यापीठाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी  आंतरराष्ट्रीय अतिथी विद्याशाखा योजनेतील प्राध्यापक कार्यरत असतील." असे डॉ. गोसावी यांनी सांगितले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories