दहावीच्या परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र आज दुपारी ३ वाजल्यापासून शाळेत मिळणार
Jun 01 2026
44
दहावीच्या परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र आज दुपारी ३ वाजल्यापासून शाळेत मिळणार
पुणे, ता. १ - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र आज, सोमवारी (ता. १) दुपारी तीन वाजल्यानंतर माध्यमिक शाळांमार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. विभागीय मंडळामार्फत माध्यमिक शाळांना सकाळी अकरा वाजता प्रमाणपत्र दिली जाणार आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली.
राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल आठ मे रोजी ऑनलाइन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात आला. अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.
उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सोमवारी परीक्षेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळेतून ते संकलित करावे, असे शिक्षण मंडळाने सांगितले आहे.
- शाळेतून प्रमाणपत्र वाटप, Students, विद्यार्थी, Secondary Education, माध्यमिक शिक्षण, Maharashtra Education News,
- निकाल, SSC Exam 2026, दहावी परीक्षा २०२६, Marksheet Distribution, गुणपत्रक वितरण, School Certificate Collection,
- Maharashtra Board, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ, MSBSHSE, Maharashtra State Board, Class 10 Result, इयत्ता दहावी
- SSC Result 2026, दहावी निकाल २०२६, SSC Marksheet, दहावी गुणपत्रक, SSC Certificate, दहावी प्रमाणपत्र,