म्हेत्रे वस्ती-चिखली परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिका गंभीर जखमी

म्हेत्रे वस्ती-चिखली परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिका गंभीर जखमी

 म्हेत्रे वस्ती-चिखली परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिका गंभीर जखमी

पिंपरी, ता. १० ऑगस्ट २०२६ - म्हेत्रे वस्ती-चिखली परिसरात रविवारी (ता. ९) दुपारी चार वर्षीय चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात चिमुरडी गंभीर जखमी झाली आहे. हा संपूर्ण प्रकार जवळील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

ही बालिका घरासमोरील मोकळ्या जागेत खेळण्यासाठी बाहेर पडली होती. त्यावेळी अचानक सात भटक्या कुत्र्यांनी तिला घेरले. तिने घाबरून पळण्याचा प्रयत्न केला. पण दोन कुत्र्यांनी खाली पाडले. त्यानंतर इतर कुत्र्यांनीही तिच्यावर हल्ला केला. तिला अनेक ठिकाणी गंभीर दुखापती झाल्या. तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांचे पथक तिच्यावर उपचार करत आहे.

या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. ही भटकी कुत्री रस्त्यांवर लावलेल्या मोठ्या गाड्यांखाली, इमारतीच्या पार्किंगमध्येही बसलेली असतात. तेथून कोणी गेल्यास ती अंगावर धावून येतात. शाळेला जाणाऱ्या लहान मुलांच्या, गाड्यांच्या मागे लागतात. शहरातील सगळीकडे हा मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या सभेत मोकाट कुत्र्यांचा प्रश्न चर्चिला गेला. पण, हा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे.  कुत्र्यांची भिती बाळगूनच दररोज बाहेर वावरावे लागते. 




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories