news
clock
अल्पवयीन गुन्हेगारांकडून युवकावर कोयत्याने हल्ला, कोयता हवेत फिरवत परिसरात दहशत

अल्पवयीन गुन्हेगारांकडून युवकावर कोयत्याने हल्ला, कोयता हवेत फिरवत परिसरात दहशत

अल्पवयीन गुन्हेगारांकडून युवकावर कोयत्याने हल्ला, कोयता हवेत फिरवत परिसरात दहशत

पिंपरी, ता. १७ - अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रमाण वाढत असल्याचे एक उदाहरण समोर आले आहे. चार अल्पवयीन गुन्हेगारांनी ''आम्ही इथले भाई आहोत, तू आम्हाला रस्त्याच्या कडेला व्हा अस म्हणतोस'' असे दरडावत २० वर्षीय युवकावर कोयत्याने हल्ला केलाय. या हल्ल्यात युवक जखमी झाला आहे. युवकाला सोडवण्यासाठी आलेल्या लोकांनाही या अल्पवयीन गुन्हेगारांनी कोयता हवेत फिरवून घाबरवले. ही घटना बुधवारी (ता. १५) टॉवर लाईन-चिखली येथे सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे. या चार अल्पवयीन गुन्हेगारांवर चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जखमी युवक आर्यन राजाराम चव्हाण (वय २० वर्षे, रा. चिखली) यान तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आर्यन हा मित्रासह मोटारसायकलवरुन घरी जात होता. तेव्हा, टॉवर लाईन भागातील टवाळखोर अल्पवयीन गुन्हेगार रस्त्यात मध्येच थांबले होते. आर्यनने हॉर्न वाजवून ''बाजूला व्हा'' असे सांगितल्याचा राग आल्याने या आरोपी अल्पवयीन गुन्हेगारांनी आर्यनजवळ येऊन ''तू आम्हाला ओळखत नाहीस का, आम्ही या भागातील भाई आहोत, तू आम्हाला रस्त्याच्या कडेला व्हा असं म्हणतोस का,  तुला माज आला आहे.'' असे दरडावले. आरोपींनी ''थांब तुला दाखवतो'' असे म्हणत लपवलेला कोयता बाहेर काढून कोयत्याने आर्यनच्या डोक्यात, दोन्ही हातावर वार केले. आर्यन गंभीर जखमी झाला.  त्यावेळी तेथील लोक आर्यनाला सोडविण्यासाठी आले असता या मुलांनी कोयता हवेत फिरवून ''आम्ही या भागातील दादा आहोत, कोणीही आमचे मध्ये पडायाचे नाही, नाहीतर कोणालाही सोडणार नाही.'', असा आरडाओरडा करत दहशत निर्माण केली व ते तेथून पसार झाले. 

या ४ अल्पवयीन गुन्हेगारांवर चिखली पोलिस ठाण्यात कलम ११८ (२), ३ (५), आर्म अॅक्ट कलम ४ (२५), क्रिमिनल लॉ अॅमॅटमेंट कलम ३, ७मपोका कायदा कलम ३७ (१) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories