news
clock
दिव्यदृष्टी ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या तीन विद्यार्थ्यांची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद

दिव्यदृष्टी ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या तीन विद्यार्थ्यांची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद

दिव्यदृष्टी ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या तीन विद्यार्थ्यांची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद

पिंपरी, ता. ४ - ओतूर (ता. जुन्नर) येथील ज्ञाता एज्युकेशनल रिसर्च अॅण्ड कौन्सिलिंग सेंटर, नारायणगावच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या दिव्यदृष्टी ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या तीन विद्यार्थ्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. 

विद्यार्थ्यांमध्ये श्री सुनील टाव्हरे या विद्यार्थ्याने डोळ्याला ब्लाइंड फोल्ड लावून केवळ २७ सेकंदामध्ये पिरॅमिड क्यूब सोडविला आहे. निरंजन शारदा जंगले या ११ वर्षीय इयत्ता ५ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने श्रीदासबोध ग्रंथातील २२९ शब्द केवळ दोन मिनिटांमध्ये डोळे बंद करून ब्लाइंड फोल्ड लावून वाचन केले. विहा स्वप्निल जुन्नरकर या विद्यार्थिनीने केवळ एका मिनिटांमध्ये डोळे बंद करुन ३८ फ्लॅश कार्ड ओळखले. यासाठी तिची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या रेकॉर्ड मॅनेजर मानसी सतीजा यांनी ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना प्रशिक्षक ज्ञानेश्वर ढोमसे यांनी मार्गदर्शन केले.

सर्व विद्यार्थी मागील एक वर्षापासून नारायणगाव येथील ज्ञाता एज्युकेशनल रिसर्च अँड काउंसेलिंग सेंटर या संस्थेच्या दिव्यदृष्टी ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये सहभागी झाले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये त्यांना ब्रेन जिम, मेडिटेशन यासारखी कौशल्ये शिकविली गेली.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories