news
clock
उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून २४ उन्हाळी विशेष गाड्यांचे नियोजन

उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून २४ उन्हाळी विशेष गाड्यांचे नियोजन

उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून २४ उन्हाळी विशेष गाड्यांचे नियोजन

पुणे, ता. ३ - उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने एप्रिल महिन्यात आणखी ४६ उन्हाळी विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते मडगाव (गोवा) तसेच आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला-मुंबई) ते संत्रागाची (पश्चिम बंगाल) या मार्गांवर धावणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे. 

या विशेष गाड्यांचे वेळापत्रक मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. ट्रेन क्रमांक ०१०१९/२० सीएसएमटी-मडगाव विशेष गाडीच्या एकूण २० साप्ताहिक फेऱ्या होणार आहेत. ही गाडी ५ एप्रिल ते ७ जून या कालावधीत दर रविवारी सीएसएमटीहून रात्री १२.५५ वाजता सुटणार आहे व त्याच दिवशी दुपारी मडगाव येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी रविवारी सायंकाळी ४ वाजता मडगावहून सुटून सोमवारी पहाटे ३.५० वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.

 ट्रेन क्रमांक ०१००१/०२ एलटीटी-संत्रागाची विशेष गाडीच्या २६ साप्ताहिक फेऱ्या होणार आहेत. ही गाडी २१ एप्रिल ते १४ जुलै या कालावधीत दर मंगळवारी रात्री ८.१५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसमधून  सुटेल व तिसऱ्या दिवशी पहाटे संत्रागाची येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी गुरुवारी दुपारी ३..५० वाजता संत्रागाचीहून सुटेल व शुक्रवारी रात्री ११.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.

तिकीट आरक्षण सुरु....

या विशेष गाड्यांसाठी आरक्षण प्रक्रिया १ एप्रिलपासून 'आयआरसीटीसी'च्या संकेतस्थळावर तसेच सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर सुरु झाली आहे. सामान्य डब्यांसाठी अनारक्षित तिकिटे 'यूटीएस' मोबाईल अॅप तसेच स्थानकांवरील तिकीट खिडक्यांवर उपलब्ध असतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी दिली आहे.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories