news
clock
निगडीत-प्राधिकरणात नागरिकांच्या उपस्थितीत 'ऑक्सिजन पार्क'चे उद्घाटन  हरित प्रकल्पांमुळे पिंपरी-चिंचवड अधिक आरोग्यदायी व सुंदर बनेल - महापौर रवी लांडगे

निगडीत-प्राधिकरणात नागरिकांच्या उपस्थितीत 'ऑक्सिजन पार्क'चे उद्घाटन हरित प्रकल्पांमुळे पिंपरी-चिंचवड अधिक आरोग्यदायी व सुंदर बनेल - महापौर रवी लांडगे

हरित प्रकल्पांमुळे पिंपरी-चिंचवड अधिक आरोग्यदायी व सुंदर बनेल - महापौर रवी लांडगे

निगडीत-प्राधिकरणात  'ऑक्सिजन पार्क'चे उद्घाटन 

पिंपरी, ता. ३ - ''निगडी-परिसरातील नागरिक आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार झालेला ऑक्सिजन पार्क हा एक अनोखा आदर्श असा पर्यावरणपूरक उपक्रम आहे. पर्यावरण संवर्धन ही सामूहिक जबाबदारी असून अशा हरित प्रकल्पांमुळे पिंपरी-चिंचवड शहर हे अधिक आरोग्यदायी आणि सुंदर बनेल.'' अशा शब्दांत महापौर रवी लांडगे यांनी विविध योजनांतील लोकसहभागाचे कौतुक केले. 

निगडी-प्राधिकरण येथील सेक्टर २६ मध्ये स्थानिक रहिवासी आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या सहभागातून विकसित करण्यात आलेल्या 'ऑक्सिजन पार्क'चे उद्घाटन महापौरांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी आमदार अमित गोरखे, उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नगरसेवक शैलजा मोरे, अनुराधा गोरखे, अमित गावडे यांच्यासह महापालिका मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे,  कार्यकारी अभियंता सुनील पवार, दिलीप भोसले, जयकुमार गुजर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, राजेंद्र बाबर, विजय नाईक, धनंजय शेडबाळे, सुर्यकांत मुथियान  व ऑक्सिजन पार्क उभारण्यात सक्रिय सहभाग नोंदविणारे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापौर लांडगे म्हणाले, '' लोकसहभागातून उभे राहणारे उपक्रम हीच शहर विकासाची खरी ताकद आहे.   शहरातील २०३ उद्यानांपैकी २५ ते ३० उद्यानांमध्ये अशी संकल्पना लोकसहभागातून राबविण्यात येईल.'' याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सर्वांनी ‘माझी वसुंधरा’ शपथ घेऊन पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. 

भावी पिढ्यांसाठी मौल्यवान

''शहरातील प्रत्येक प्रभागात हरित क्षेत्र वाढावे, यासाठी प्रशासन आणि नागरिक एकत्र येत आहेत. लोकसहभागातून साकारलेले ऑक्सिजन पार्क हे भावी पिढ्यांसाठी मौल्यवान ठेवा आहे.''

– शर्मिला बाबर, उपमहापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका


हरित शहराच्या संकल्पनेला बळ देणारा प्रकल्प 

''वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर हरित क्षेत्रांचे जतन व संवर्धन अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांच्या सहभागातून साकारलेला हा प्रकल्प पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल आणि हरित शहराच्या संकल्पनेला बळ देईल.''

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories