सुसगावमध्ये काँक्रीट मिक्सर ट्रकची दुचाकीला धडक; तरुणीचा मृत्यू
पिंपरी, ता. ६ - सुस-नांदे रस्त्यावर शिवबा चौक परिसरात भरधाव काँक्रीट मिक्सर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. ५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात ट्रक चालक व मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजली शंकर साळवे (वय १८, रा. प्रकाशनगर, सुसगाव) ही गुरुवारी सायंकाळी दुचाकीवरून सुस-नांदे रस्त्याने घरी येत होती. शिवबा चौकाजवळ मासे मार्केटसमोर नांदे गावाच्या दिशेने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या टाटा कंपनीच्या काँक्रीट मिक्सर ट्रकने (क्र. MH 12 RN 7825) तिच्या दुचाकीला मागून जोराची धडक दिली. या अपघातात अंजली गंभीर जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी नेण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी शंकर लक्ष्मण साळवे (वय ४८) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ट्रक चालक राजपाल संभाजी कसबे (वय ३४, रा. नांदे) व ट्रक मालक गणेश महातेश्वर कलशेट्टी (वय ४०, रा. शिवणे, पुणे) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०५, २८१, ३२४(४), ४९, ३(५) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९/१७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.