news
clock

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून तरुणाला मारहाण

पिंपरी, ता. ७ - दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून तरुणाला मारहाण करून त्याचे नाकाचे हाड फ्रॅक्चर केल्याची घटना ३ मार्चला दापोडीमध्ये येथे घडली. या प्रकरणी चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपींविरोधात शुक्रवारी (ता. ६) दापोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रांशु शाम बारमेडा (वय २५, रा. सांगवी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मारहाणीच्या घटनेत १. गणेश भिसे, २. राम अशोक कांबळे (वय-२४ वर्षे रा. दापोडी-सिद्धार्थनगर),  ३. संकेत भालचंद्र वाघमारे (वय २० वर्षे, रा. दापोडी -सिद्धार्थनगर) व  वेदांत मोरे (वय २४ वर्षे, रा. दापोडी-सिद्धार्थनगर) हे आरोपी आहेत.  

 फिर्यादी बारमेडा यांचा मातीची भांडी विक्रीचा व्यवसाय आहेत. फिर्यादी दुकानामध्ये असताना आरोपींनी  दुकानासमोर येऊन 'आम्हाला दारु पिण्यासाठी १००० रुपये दे' असे म्हटले. बारमेडा यांनी आरोपींना पैसे दिले नाहीत. याचा मनात राग धरुन त्यांनी बारमेडा यांना 'आम्ही इथले बाप आहोत', असे म्हणत बारमेडा यांना शिविगाळ व दमदाटी केली, त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर केले. आरोपींना अटक केली आहे. 

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११७(२), ३५२, ३५१(२)(३) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories