ताडोबा अभयारण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उभारले १६ कृत्रिम पाणवठे
पुणे, ता. १८ - चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील तहानलेल्या हरणांचा व्हिडीओ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाहिला आणि काही तासांतच मनसेच्या कार्यकर्त्यांनी अभयारण्यात तब्बल १६ कृत्रिम पाणवठे उभारले आहे.
अभयारण्यातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटल्यामुळे हरीण आणि इतर वन्यप्राणी पाण्याच्या शोधात जंगलाबाहेर येत होते. पाणी शोधणाऱ्या हरणांचा व्हिडिओ राज ठाकरे यांनी पाहिल्यानंतर तातडीने मनसे पदाधिकाऱ्यांना पाण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले. त्यांनी मनसेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे कार्यकर्त्यांनी अवघ्या काही तासांत ताडोबा बफर परिसरात १६ कृत्रिम पाणवठे तयार केले. प्रत्येक पाणवठ्यावर पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या पाणवठ्यांमुळे वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाले आहे.
याबाबत बोलताना मनसेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे म्हणाले, ''महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसात ताडोबा बफर आणि जंगलाच्या सीमेवर १६ कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. या प्रत्येक ठिकाणी नियमित पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाच्या तडाख्यात भटकणाऱ्या वन्यप्राण्यांना या पाणवठ्यांमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. तब्बल ४० कृत्रिम पाणवठे तयार करण्यात येणार आहेत.''
- द्रपूर, Chandrapur, मनसे कार्यकर्ते, MNS workers, पर्यावरण संवर्धन, Environmental conservation,
- , पाणी उपलब्धता, Water availability, वन्य प्राणी, Wild animals, हरण, Deer, अभयारण्यातील हरीण, Deer in reserve, पाण्याची व्यवस्था, Water arrangement,
- मनसे, MNS, राज ठाकरे, Raj Thackeray, कृत्रिम पाणवठे, Artificial water tanks,
- महाराष्ट्र नवनिर्माण सेना, Maharashtra Navnirman Sena
- ताडोबा अभयारण्य, Tadoba Tiger Reserve, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, Tadoba-Andhari Tiger Project,