पंतप्रधान आवास योजनेंतर्गत तळेगाव दाभाडेमध्ये ५२८ घरांना मंजुरी 

पिंपरी, ता. २६ - शहरी पंतप्रधान आवास (शहरी २.०) योजनेंतर्गत तळेगाव दाभाडे शहरासाठी ५२८ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे येथील सर्वसामान्य व नागरिकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे.या योजनेच्या मंजुरीसाठी आमदार सुनील शेळके यांनी पाठपुरावा केला आहे.

याबाबत नवी दिल्ली येथे गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली २३ फेब्रुवारी रोजी बैठक झाली. यात केंद्रीय मंजुरी व देखरेख समितीने (सीएसएमसी) देशभरातील २ लाख ८८ हजार अतिरिक्त घरांना मंजुरी दिली.  त्यामध्ये तळेगाव दाभाडे शहराचाही समावेश आहे.

शासन निकषांनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांचा सर्वेक्षण करून २६ डिसेंबर २०२५ रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. शहरातील सुमारे दोन हजार ५०० नागरिकांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी ५६८ लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळणार आहे. या प्रत्येक लाभार्थ्यास सुमारे ४२० चौरस फुटांचे घर उपलब्ध होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधानाची भावना आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance