तळेगाव एमआयडीसीमध्ये टेम्पोची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू

तळेगाव एमआयडीसीमध्ये टेम्पोची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू

तळेगाव एमआयडीसीमध्ये टेम्पोची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू

पिंपरी, ता. १ - तळेगाव एम.आय.डी.सी. परिसरात भरधाव आयशर टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (ता. ३१) दुपारी १:३० वाजता घडला आहे. टेम्पोचालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विजय तुळशीराम कापडे असे मृत इसमाचे नाव आहे. 

याबाबत राहुल मनोहर पाटील (वय ३३, रा. चाकण, ता. खेड) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. मयत व्यक्ती राहुलचे मामा आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अरविंदकुमार विजय बहादुर यादव (वय ५० वर्षे, रा. वसई, जि. पालघर) हा त्याच्या ताब्यातील आयशर टेम्पो तळेगाव-चाकण रस्त्यावर अविचारीपणे आणि भरधाव वेगाने चालवत होता. त्यातच त्याने समोरुन येणाऱ्या होंडा शाईन मोटारसायकलला व कापडे यांना जोरात धडक दिली. या धडकेत कापडे गंभीर जखमी झाले. तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेले असता, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. 

या प्रकरणी पोलिसांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. ३१) आरोपी टेम्पोचालकावर भारतीय न्याय संहिता कलम २८१,१०६ (१), १२५ (a), १२५ (ड), मोटार वाहन कायदा १९८९ चेकलम १८४, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories