चाकणमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, दोघांना अटक

चाकणमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, दोघांना अटक

चाकणमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, दोघांना अटक

पिंपरी, ता. १ - चाकण-तळेगाव रस्त्यावरील तळेगाव चौक-नाणेकरवाडी येथे मंगळवारी (ता. ३१) जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून दोघांना अटक केली. आरोपींविरोधात चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस शिपाई निखिल बाळासाहेब वर्षे (अंमली पदार्थविरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी वाल्मिक पुंडलिक लांजेवार (वय २९) व जीवन बळीराम राठोड (वय २४) यांना ताब्यात घेतले आहे. आरोपी लोकांना पत्त्यांवर आकडे लिहून हातचलाखीने फसवून त्यांच्याकडून पैसे उकळत जुगार खेळवत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य आणि ३,२०० रुपयांची रोख रक्कम जप्त केली.

या प्रकरणी आरोपींविरोधात चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories