वॉशिंग सेंटरवर किरकोळ वादातून तरुणाला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा

वॉशिंग सेंटरवर किरकोळ वादातून तरुणाला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा

वॉशिंग सेंटरवर किरकोळ वादातून तरुणाला मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा 

पिंपरी, ता. १ - ताथवडे येथे रविवारी (ता. २९) व्हेईकल वॉशिंग सेंटरवर सायंकाळी झालेल्या किरकोळ वादातून दोन इसमांनी ३० वर्षीय तरुणाला शिवीगाळ करत मारहाण केली. याबाबत, मंगळवारी (ता. ३१) हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन इसमांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत राहुल देवीदास व्यवहारे (वय ३०, रा. कोढवा खुर्द, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी राहुल आपली महिंद्रा बोलेरो पिक-अप ही गाडी वॉशिंग रॅम्पवरुन मागे घेत होते. तेव्हा क्रेटा कारला किरकोळ धक्का लागला.

स्वतःला संबंधित कारचा चालक असल्याचे सांगणाऱ्या एका अज्ञात इसमाने फिर्यादीच्या गाडीची चावी काढून घेत शिवीगाळ केली. त्यानंतर त्याच्या सोबत असलेल्या दुसऱ्या इसमाने रिकाम्या बीअरच्या बाटलीने फिर्यादीच्या डोक्यात मारुन जखमी केले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories