प्रियकराच्या मदतीने पतीला दारु पाजून मारहाण, भोसरीतील घटना

प्रियकराच्या मदतीने पतीला दारु पाजून मारहाण, भोसरीतील घटना

प्रियकराच्या मदतीने पतीला दारु पाजून मारहाण, भोसरीतील घटना 

पिंपरी, ता. १ - सद्गुरुनगर-भोसरी परिसरात पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला दारु पाजून मारहाण केल्याची घटना २८ मार्चला घडली. या प्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. ३१) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत, अमोल संग्राम ढवळे (वय २८ वर्ष, रा.  ता. भोर) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. फिर्यादीची पत्नी व तिचा प्रियकर आरोपी अजय नात्रे (वय अंदाजे ३०, रा. सद्गुरुनगर, भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

 आरोपी महिलेने तिचा पती फिर्यादी अमोलला भोसरी येथे बोलावून घेतले. त्यानंतर तिने तिचा प्रियकर अजय नात्रे (वय अंदाजे ३०, रा. सद्गुरुनगर, भोसरी) याच्या मदतीने अमोलला ती राहात असलेल्या घरात नेऊन दारु पाजली. त्यानंतर दोघांनी मिळून हाताने तसेच रबरी पाईपने अमोलला मारहाण केली. अजय नात्रे याने लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या चेहऱ्यावर, मानेवर आणि पाठीवर वार करुन त्याला जखमी केले. यावेळी अमोल आरडाओरडा करत असताना आरोपी पत्नीने घराचा दरवाजा आतून बंद करुन मारहाणीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केल्याचे अमोलने तक्रारीत सांगितले, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

 पोलिसांनी आरोपींविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. ३१) भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५, ३५१(३), ३(५) तसेच भादंवि कलम ३२४, ३२३, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अटक झालेली नाही. पोलिस तपास करत आहेत.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories