तीन पत्ती जुगार खेळणाऱ्यांना नोटीस, गुन्हा दाखल

पिंपरी, ता. १६ - अजंठानगर-चिंचवड येथे रविवारी तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या पाच जणांना निगडी पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य जप्त करुन त्यांना नोटीस बजावली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी  अजंठानगर-चिंचवड येथील सीएनजी पंपाच्या विरुध्द बाजूस मोकळया जागेत १) भिमा दत्ता कांबळे (वय ३३ वर्षे ), २) हनुमंत महादेव जाधव (वय-४० वर्षे), ३) भागवत मारुती शिंदे (वय-५४ वर्षे), ४) संदेश लिंबाजी खोपे (वय ३८ वर्षे) व ५) अक्षय विजय येकाळे (वय-२९ वर्षे) हे पाचजण तीन पत्ती जुगार खेळत होते. त्यांच्याकडे पत्याचा कॅट व रोख रक्कम २,२८०/- रुपये सापडले.

जुगाराचे साहित्य जप्त करुन पोलिसांनी आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना  नोटीस दिली आहे

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance