टीईटी परीक्षा 28 जूनला, उमेदवारांसाठी परीक्षा केंद्रांची निश्चिती
पुणे, ता. २७ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा’ (टीईटी) २८ जूनला होणार आहे.
ही परीक्षा पेपर १ आणि पेपर २ साठी दोन सत्रांमध्ये घेतली जाईल. प्रवेशपत्रे १६ जून २०२६ ते २८ जून २०२६ पर्यंत डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असतील.
या परीक्षेसाठी कमी उमेदवार संख्या असलेल्या माध्यमांतील एक हजार ७०१ उमेदवारांना परीक्षा केंद्रे निश्चित केली आहेत.
परीक्षेसाठी राज्यातून बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती, सिंधी माध्यमांच्या उमेदवारांची संख्या कमी प्रमाणात असते. त्यामुळे अशा उमेदवारांसाठी परीक्षा केंद्र निश्चित करण्याची प्रक्रिया परीक्षा परिषदेमार्फत करण्यात येत असल्याचे चोथे यांनी स्पष्ट केले.