ट्रॅफिक बडी या ऑनलाईन वॉट्सअॅप चॅटबॉटव्दारे नागरिकांच्या १ हजार ६३८ तक्रारींचा निपटारा

ट्रॅफिक बडी या ऑनलाईन वॉट्सअॅप चॅटबॉटव्दारे नागरिकांच्या १ हजार ६३८ तक्रारींचा निपटारा

ट्रॅफिक बडी या ऑनलाईन वॉट्सअॅप चॅटबॉटव्दारे नागरिकांच्या १ हजार ६३८ तक्रारींचा निपटारा

पिंपरी, ता. ११ जुलै २०२६ - पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक शाखेने जून २०२६ मध्ये ट्रॅफिक बडी या ऑनलाईन वॉट्सअॅप चॅटबॉट व्दारे नागरिकांच्या १ हजार ६३८ तक्रारींचा निपटारा केला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील  नागरिकांना त्यांच्या दैनंदिन व्यवहारात वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने निर्माण होणा-या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशाने पोलिस सह आयुक्त शशीकांत महावरकर व अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅफिक बडी हा ऑनलाईन वॉट्सअॅप चॅटबॉट उपक्रम राबवण्यात येत आहेत.

जूनमध्ये ट्रॅफिक बडी वॉट्सअॅप चॅट बॉटवर पिंपरी-चिंचवड आयुक्तालय कार्यक्षेत्रातून एकूण १६३८ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. नागरिकांनी ट्रॅफिक बडी वॉट्सअॅप चॅट बॉट क्रमांक ८७८८६४९८८५ याचा वाहतूक कोंडी, वाहतूक नियमन व इतर वाहतूक विषयक समस्या सोडविण्याकरीता जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड आयुक्ताल कार्यक्षेत्रामध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना वाहतूक पोलिसांमार्फत आवाहन करण्यात येते.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories