'एकदिवस शाळेसाठी' उपक्रमात वाहतूक पोलिसांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
पिंपरी, ता. १७ जुलै २०२६ - पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक शाखेतर्फे दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या गुरूवारी 'एकदिवस शाळेसाठी' हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमांतर्गत वाहतूक पोलिस विद्यार्थ्यांमध्ये रस्ते सुरक्षा, वाहतूक नियमन, अपघातांविषयी माहिती, अंमलीपदार्थ व व्यसनाधिनतेपासून दूर राहणे, सायबर गुन्हेगारी, सोशल् मिडियाचा वापर इत्यादी मुद्यांवर मार्गदर्शन करण्यात येते. दिनांक १६ जुलैच्या गुरुवारी राबवलेल्या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
१६ जुलै २०२६ च्या गुरुवारी वाहतूक शाखेमार्फत ३१ व्या टप्प्यात एकूण १४ गटांमधील १२ अधिकारी व १८ अंमलदार यांनी निवडलेल्या १४ शाळांमधून सुमारे १८३५ विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांना पीपीटीद्वारे मुद्देसूद मार्गदर्शन केले. एक दिवस शाळेसाठी या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत एकूण ३१ टप्प्यांमध्ये ५०२ शाळांमध्ये जाऊन १ लाख १३ हजार १७१ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक व चांगला माणूस बनावे या दृष्टीकोनातून पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागामार्फत या प्रबोधनपर उपक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यात आले आहे.
सदर उपक्रम पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलिस सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख तसेच वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्यामार्फत शस्वीरित्या पार पडला. या विद्यार्थीभिमुख उपक्रमाचा पुढील टप्पा गुरुवार, दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजीत करण्यात येणार आहे.
- अंमली पदार्थ विरोधी जनजागृती, Anti Drug Awareness, व्यसनमुक्ती, De-addiction Awareness, शालेय विद्यार्थी, School Students
- रस्ता सुरक्षा, Road Safety, वाहतूक नियमन, Traffic Rules, Traffic Awareness, अपघात प्रतिबंध, Accident Prevention, सायबर गुन्हेगारी, Cyber Crime Awareness, सोशल मीडिया वापर, Social Media Usage
- पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस, Pimpri Chinchwad Traffic Police, वाहतूक शाखा, Traffic Branch, विद्यार्थी मार्गदर्शन, Student Guidance
- एकदिवस शाळेसाठी उपक्रम, One Day For School Initiative