पिंपरीमध्ये भरधाव ट्रकची टँकरला धडक, कामगाराचा मृत्यू
पिंपरी, ता. २२ - पिंपरीतील संत तुकारामनगर मेट्रो रेल्वे स्टेशनजवळ (पिलर क्र. पी-३३५) झालेल्या अपघातात एक कामगार गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी (ता. २१) सकाळी ७.१० घ्या सुमारास घडला.
फिर्यादी गणेश शंकर जाधव (वय ३६, व्यवसाय: ड्रायव्हर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा टँकर त्या ठिकाणी पाणी टाकत होता. तेव्हा, आरोपी नरेशकुमार सुरेंद्र दास (वय २४) याने ट्रक भरधाव चालवत येथील टँकरला जोरात धडक दिली. या धडकेमुळे टँकरचे नुकसान झाले आणि टँकरवर काम करणारा शामसुंदर शेषराम गौतम (वय २२, रा. दापोडी, पुणे) गंभीर जखमी झाला, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी नरेशकुमार दास यास अटक केली असून, गुन्हा भारतीय दंड संहिता २८१, १०६(१), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, ११९/११७ प्रमाणे नोंदवला आहे.