पवना-इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत मंत्री पंकजा मुंडे उद्या पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर
Apr 09 2026
14
पवना-इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत मंत्री पंकजा मुंडे उद्या पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर
पिंपरी, ता. ९ - पवना आणि इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाच्या विषयामध्ये पर्यावरण, वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे अधिक लक्ष घालणार आहेत. त्यासाठी त्या उद्या, शुक्रवारी (ता. १०) पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत.
या दौऱ्यामध्ये पंकजाताई दुपारी एक वाजता त्या तळवडे येथील 'रॉ वॉटर पंपिंग स्टेशन' आणि इंद्रायणी नदीच्या सद्यःस्थितीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी १:३०
वाजता रावेत येथील पंपिंग स्टेशनला भेट देऊन पवना नदीच्या प्रदूषणाचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर दुपारी २ च्या सुमारास पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील कार्यालयात त्या नदी प्रदूषणावरील उपाययोजनांबाबत महत्त्वाची बैठक घेतील. शनिवारी (ता. ११) पंकजा मुंडे या पुण्यातील मुळा-मुठा नदी प्रदूषणाची पाहणी करतील.
पवना व इंद्रायणी नदीचे वाढते प्रदूषण पाहता पंकजा मुंडे यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे. नदी प्रदूषणावर ठोस उपाययोजना केल्या जातील, अशी शहरवासियांना अपेक्षा आहे.