किवळे गृहप्रकल्पातील लाभार्थ्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अन्यथा आंदोलन .... कष्टकरी संघर्ष महासंघाचा इशारा

किवळे गृहप्रकल्पातील लाभार्थ्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अन्यथा आंदोलन .... कष्टकरी संघर्ष महासंघाचा इशारा

किवळे गृहप्रकल्पातील लाभार्थ्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अन्यथा आंदोलन .... कष्टकरी संघर्ष महासंघाचा इशारा  

पिंपरी, ता. ८ ऑगस्ट २०२७ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा किवळे येथील गृहप्रकल्प पूर्ण न झाल्याने लाभार्थ्यांवर किवळे येथील घरे दुप्पट किमतीने स्वीकारण्याची वेळ आली आहे. प्रशासनाच्या निष्काळजी कारभारामुळे किवळे गृहप्रकल्पातील शेकडो लाभार्थ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून हा अन्याय सहन करावा लागत आहे. लाभार्थ्यांच्या मागण्या प्रशासनाने तातडीने पूर्ण काराव्यात. याबाबत येत्या आठ दिवसांत सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र जनआंदोलन उभारले जाणार आहे, अशी घोषणा कष्टकरी संघर्ष महासंघाच्या शनिवारी (ता. ८) झालेल्या बैठकीनंतर करण्यात आली. 

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्राच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या बैठकीत किवळे प्रकल्पातील लाभार्थ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ''अनेकांनी बँकेचे कर्ज मंजूर करून महिनोनमहिने हप्ते भरले, परंतु आजही घराचा ताबा मिळालेला नाही. हा केवळ प्रशासकीय विलंब नसून सामान्य कष्टकरी कुटुंबांच्या स्वप्नांशी खेळ करण्याचा प्रकार आहे. जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता त्यांची आर्थिक व मानसिक पिळवणूक करणाऱ्या प्रशासनाचा आम्ही तीव्र निषेध करतो.''

किवळे गृहप्रकल्पाचा तात्काळ ताबा मिळावा, ताबा मिळेपर्यंत बँक हप्त्यांची जबाबदारी महानगरपालिकेने स्वीकारणे, मुद्रांक शुल्क माफ करून त्वरित नोंदणी, गृहप्रकल्पातील मूलभूत सुविधा आणि पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अर्थसहाय्य या प्रमुख मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, येत्या ८ दिवसांत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर लाभार्थ्यांच्या न्यायासाठी तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा नखाते यांनी दिला आहे. 




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories