news
clock
मुंबई-बंगळुरु  मार्गावर धावणार वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा

मुंबई-बंगळुरु मार्गावर धावणार वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा

मुंबई-बंगळुरु  मार्गावर धावणार वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा 

पुणे, ता. १६ -  'वंदे भारत' एक्सप्रेस सुरु आता नव्या रुपात प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. वंदे भारतच्या या नव्या रुपात स्लीपर सुविधा असणार आहे. मुंबई-बंगळुरू या मार्गावर ही सेवा सुरु होणार असून या सेवेचा सर्वाधिक लाभ पुणे आणि सोलापूर मार्गावरील प्रवाशांना होणार आहे, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात घोषणा केली असून मुंबई-बंगळुरु या मार्गावर ही ट्रेन सुरू होणार आहे. यामुळे पुणे, सोलापूर आणि बंगळुरू दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना अधिक आरामदायी आणि जलद पर्याय उपलब्ध होणार आहे.

१७ जानेवारी २०२६ रोजी हावडा-कामाख्या मार्गावर देशातील पहिली स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली होती. त्यानंतर ५ एप्रिल २०२६ रोजी दुसऱ्या स्लीपर वंदे भारतला मंजुरी देण्यात आली. ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते KSR बंगळुरू दरम्यान धावणार असून महाराष्ट्रातील ही पहिली स्लीपर वंदे भारत ठरणार आहे.  वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसमुळे हा प्रवासाचा कालावधी फार कमी होणार आहे.

ही स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू होऊन पुणे, सोलापूर आणि वाडी मार्गे बंगळुरूकडे जाणार आहे. काही पर्यायी मार्गामध्ये कलबुर्गी किंवा हुबळी मार्गाचाही विचार सुरू आहे. गाडीचा वेग सुमारे १३० किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही नवीन सेवा सुरू झाल्यानंतर सध्या धावणाऱ्या उद्यान एक्सप्रेससारख्या गाड्या बंद होणार नाहीत. दोन्ही सेवा एकत्र सुरू राहणार असल्याने प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले. 


तिकिट दर (अंदाजे)

AC 3-टियर : सुमारे ₹२,५००

AC 2-टियर : सुमारे ₹३,००० ते ₹३,२००

First AC : सुमारे ₹३,६०० ते ₹३,९००



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories