मावळ शिक्षक प्रबोधन परिवाराततर्फे वडगावमध्ये १६ ते १८ एप्रिल दरम्यान वसंत चैतन्य व्याख्यानमाला
मावळ शिक्षक प्रबोधन परिवाराततर्फे वडगावमध्ये १६ ते १८ एप्रिल दरम्यान वसंत चैतन्य व्याख्यानमाला
पिंपरी, ता. ११ - मावळ शिक्षक प्रबोधन परिवाराततर्फे वडगाव येथे १६ ते १८ एप्रिल दरम्यान वसंत चैतन्य व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. वडगावातील डी. एड. महाविद्यालयात व्याख्याने होतील. या व्याख्यानमालेमध्ये गुणवंत शिक्षकांना गौरवण्यात येणार आहे.
गुरुवारी (ता. १६) दुपारी १२ वाजता आमदार सुनील शेळके व सारिका शेळके यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन होईल. पहिल्या दिवशी प्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील यांचे व्याख्यान होईल. सभापती सुनीता येवले अध्यक्षस्थानी, तर उद्योजक अशोक बाफना प्रमुख पाहुणे असतील.
शुक्रवारी (ता. १७) प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांचे व्याख्यान होईल. यावेळी, तळेगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण भोसले, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर यांची प्रमुख उपस्थिती असेल.
शनिवारी (ता. १८) समाजसेवक यजुवेंद्र महाजन यांच्या व्याख्यानाने व्याख्यानाचा समारोप होईल. शिक्षक नेते भगवान शिंदे व भिकल्या धिंडा प्रमुख पाहुणे असणार आहेत. अस. यावेळी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार समारंभ होणार आहे. मावळ शिक्षक प्रबोधन परिवाराचे संस्थापक राजू भेगडे, शिवाजीराव ठाकर, अध्यक्ष बाबासाहेब औटी, उपाध्यक्ष सहदेव डोंबे, कार्याध्यक्ष तानाजी शिंदे, गोरक्ष जांभूळकर, सचिव अमोल चव्हाण, उपक्रम प्रमुख हरिश्चंद्र शिवदे, मल्हारी आडकर, कुंडलिक लोटे आदींनी व्याख्यानमालेचे संयोजन केले आहे. व्याख्यानमालेचे हे चौथे वर्ष आहे.