पोलिसांनी नजरचुकीने राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर नोंदवला दुसऱ्या व्यक्तीचा गुन्हा

पोलिसांनी नजरचुकीने राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर नोंदवला दुसऱ्या व्यक्तीचा गुन्हा

 पोलिसांनी नजरचुकीने राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर नोंदवला दुसऱ्या व्यक्तीचा गुन्हा  

पुणे, ता. २२ - वारकरी संप्रदायाबाबत आक्षेपार्ह विधान केल्याच्या आरोपाखाली आळंदी येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांना गुरुवारी (ता. २१) वाघोली पोलिसांनी अटक केली. पण, जो गुन्हा लवांडे यांनी केलाच नाही तो गुन्हा त्यांच्या नावावर दाखवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नजरचुकीने अशी चूक झाल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे. या प्रकारामुळे पोलिसांवर टिका होत आहे. 

पोलिसांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचा रिपोर्ट दाखल केला होता. या रीपोर्टमध्ये गौतम कांबळे नावाच्या व्यक्तीवर दाखल असलेला गुन्हा विकास  तो लवांडे यांच्या जामीन अर्जाच्या रिपोर्टमध्ये दाखवला होता.  अटकेनंतर लवांडे यांनी एक्स पोस्टद्वार भावना व्यक्त केली होती. या पोस्टमध्ये लवांडे यांनी म्हटले होते की, '' माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे व इतर सर्व आरोपी मोकाट असून वाघोली पोलीस स्टेशनचे पोलिस एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले मी घरी नव्हतो. कुटुंबीयांना माझ्या अटकेबाबत निरोप दिला कुटुंबांना घाबरवण्याचा हा प्रयत्न होता काय ? असा माझा सवाल आहे ? पोलीस मला फोन करू शकले असते. मी फरार नाही किंवा माफीवीर नाही. शासनाने मला जरूर अटक करावी मी पोलिसांना सहकार्य करणारा माणूस आहे कारण मी कायदा पाळणारा माणूस आहे कायदा हातात घेणारा माणूस नाही. सत्यासाठी लढत राहणार सत्याग्रही पद्धतीने जामीन , वकील ,दंड देणार नाही. पुणे पोलिसांनी मला जरूर अटक करावी मी तयार आहे. आता मला पुण्यातून पोलीस वाघोली पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले आहेत.''




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories