विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक; राज्यपालांच्या हस्ते गौरव

विनय कुमार चौबे यांना राष्ट्रपती पोलीस पदक; राज्यपालांच्या हस्ते गौरव

पिंपरी-चिंचवड | ९ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना उल्लेखनीय प्रशासकीय सेवेसाठी जाहीर झालेले राष्ट्रपती पोलीस पदक (पीपीएम) शुक्रवारी (दि. ९) मुंबई येथे प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते लोकभवनातील दरबार हॉलमध्ये आयोजित पदक अलंकरण समारंभात चौबे यांचा गौरव करण्यात आला.

राष्ट्रपतींनी १५ ऑगस्ट २०२३ रोजी विनय कुमार चौबे यांना प्रशासकीय सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर केले होते. त्यानंतर ९ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित समारंभात त्यांना हे पदक प्रत्यक्ष प्रदान करण्यात आले.

पोलीस दलातील उल्लेखनीय सेवा, कर्तव्यनिष्ठा आणि प्रशासकीय कार्यातील योगदानाबद्दल चौबे यांना मिळालेला हा सन्मान महत्त्वपूर्ण मानला जात आहे. त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेत केलेल्या कार्याची या पदकाच्या माध्यमातून दखल घेण्यात आली आहे.

मुंबईतील लोकभवनाच्या दरबार हॉलमध्ये झालेल्या पदक अलंकरण समारंभात राज्यपालांच्या हस्ते पदक स्वीकारण्याचा मान चौबे यांना मिळाला. राष्ट्रपती पोलीस पदक हा पोलीस सेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी प्रतिष्ठेचा सन्मान मानला जातो.

विनय कुमार चौबे यांच्या या गौरवामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचा आणि प्रशासकीय कार्याचा हा गौरव पोलीस दलासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories