काळेवाडीत येत्या शनिवारी विरांगना महिला महासंघाचे उद्घाटन
आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त संगीत मैफलीचेही आयोजन
पिंपरी, ता. २ - चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या शनिवारी (ता. ४) काळेवाडी येथे ‘विरांगना महिला महासंघ’ उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने खास महिलांसाठी “रजनीगंधा” या मराठी व हिंदी गीतांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन नगरसेवक विनोद नढे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
शनिवारी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत नगरसेवक विनोद नढे जनसंपर्क कार्यालय, पवना चौक, नढेनगर येथे हा कार्यक्रम होईल. या सोहळ्यात नारीशक्तीचा गौरव करत विविध बचत गटांचा सन्मान करण्यात येणार आहे. कला, क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव केला जाणार आहे. सायंकाळी ८ ते १० या वेळेत उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
“रजनीगंधा” ही संगीत मैफिलीत मराठी व हिंदी गीतांच्या सुरेल सादरीकरण होणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाला काळेवाडी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिलांच्या सन्मानाचा आणि कलात्मकतेचा उत्सव अनुभवावा, असे आवाहन विरांगणा महिला महासंघच्या संस्थापक प्रियांका नढे आणि नगरसेवक विनोद नढे यांच्या वतीने करण्यात आले आहे.