news
clock

वाकडमधील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्सेस महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन - 'उमंग २०२६' उत्साहात 

पिंपरी, ता. ६ - वाकड येथील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्सेस महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन 'उमंग २०२६' नटसम्राट निळू फुले सभागृहात उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी विविध नृत्यप्रकार, सुरेल गायन आणि नाट्यप्रयोग सादर केले. दुसऱ्या दिवशी महाविद्यालयात बक्षीस वितरण समारंभ पार पडला. स्नेहसंमेलनाचा हा सोहळा स्मरणीय ठरला. 

या सोहळ्यासाठी साई सकल प्रसारक मंडळाचे संचालक ज्ञानेश्वर दळवी व सचिव आरती दळवी या प्रमुख मान्यवरांसह प्राचार्य डॉ. महेश देशपांडे, डॉ. भाग्यश्री दुधाडे, डॉ. ज्योती शिंदे, लक्ष्मण क्षीरसागर व रजिस्ट्रार अशोक कुंभार उपस्थित होते. डॉ. प्रकाश यादव, गिरीश कारडिकर व डॉ. देवेन सूर्यवंशी या मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. 

याप्रसंगी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रा. साक्षी चितारे यांनी मनोगतातून मराठी भाषेचे संवर्धन व जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. 'उमंग २०२६'चे अध्यक्ष डॉ. महेंद्र सोनावणे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. स्नेहल कुंभारखाने, क्रीडा प्रमुख प्रा. संदीप माने आदींनी संयोजन केले. सोहळ्याचे तांत्रिक संयोजन प्रा. अश्विनी पवार व  सहकाऱ्यांनी केले. प्रा. चैताली चव्हाण, प्रा. प्रीती नखोले, प्रा. प्रियांका घाडगे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. ज्योती शिंदे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories