news
clock

जागतिक महिला दिनानिमित्त दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये ८ मार्चला दुय्यम निबंधकांचा कार्यभार महिलांच्या हाती  

पिंपरी, ता. ६ - जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्चला पुणे शहरातील दुय्यम निबंध कार्यालयासह हवेली तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दुय्यम निबंधकांचा कार्यभार महिला कर्मचाऱ्यांच्या हाती असणार आहे. याबाबतचे पत्र सह जिल्हा निबंधक वर्ग तथा पुणे शहर मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी काढले आहे. 

जागतिक महिला दिनी महिलांचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम आयोजित केला आहे. पुणे शहरातील ११ सह जिल्हा निबंधक कार्यालय आणि हवेली तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये निबंधक म्हणून महिला कर्मचारी काम करतील. महिला दिनानिमित्त काही दस्त नोंदणीसाठी स्वीकारले जातील. 

यामध्ये महिला खरीददाराच्या लाभातील खरेदीखत, करारनामे, दस्तऐवजांची नोंदणी शासनाच्या अधिसूचनेनुसार मुद्रांक शुल्कामध्ये एक टक्का सवलत ध्येय असलेले सर्व प्रकारचे दस्तऐवज नोंदवले जातील. महिला पक्षकारांच्या मृत्युपत्राचा दस्त, महिला पक्षकारांच्या लाभातील कुलमुखत्यार पत्राचा दस्त आणि ज्या दस्तांमध्ये महिला पक्षकार असतील ओळख देणाऱ्या महिला वकील असतील असे सर्वसाधारण दस्तऐवज नोंदविले जाणार आहेत. महिलांना मालमत्ता हक्क व कायदेशीर सक्षमीकरणाच्या दृष्टीने प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागे मुख्य उद्देश आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories