वाकड पुलाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, नगरसेविका श्रुती वाकडकर यांचे आयुक्तांना निवेदन

वाकड पुलाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, नगरसेविका श्रुती वाकडकर यांचे आयुक्तांना निवेदन

वाकड पुलाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, नगरसेविका श्रुती वाकडकर यांचे आयुक्तांना निवेदन

पिंपरी, ता. २८ - वाकड परिसरातील बेंगळुरु–मुंबई महामार्गावरील वाकड पुलाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. नागरिकांना होत असलेला वाढता त्रास लक्षात घेऊन पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी नगरसेविका, महापालिकेच्या शिक्षण समिती सदस्य श्रुती वाकडकर यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. 

याबाबत, वाकडकर यांनी डॉ. सूर्यवंशी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, पुलाचे काम अर्धवट असल्याने सकाळी व संध्याकाळी वाकड, पुनावळे, ताथवडे, हिंजवडी तसेच परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून नागरीकांना विशेषतः कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी, रुग्णवाहिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाकड पुलाचे काम वाहतूक सुरळीत करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आले होते. मात्र, काम रखडल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. 

त्यामुळे पुलाचे रखडलेले काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे.  काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक नियोजनासाठी आवश्यक तात्पुरत्या उपाययोजना कराव्यात. आयुक्तांनी या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन संबंधित विभागास आवश्यक सूचना द्याव्यात, असे वाकडकर यांनी म्हटले आहे. 






Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories