उघड्या पाण्याच्या टाकीत पडून साडेतीन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, सांगवीतील घटना
Apr 02 2026
121
उघड्या पाण्याच्या टाकीत पडून साडेतीन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, सांगवीतील घटना
पिंपरी, ता. २ - नवीन बांधकामाच्या ठिकाणी उघड्या असलेल्या पाण्याच्या टाकीत पडून साडेतीन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना ३१ मार्चला रात्री ८ ते ११ या वेळेत पवनानगर-सांगवी येथे घडली.
तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. १) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत, चिमुकलीचे वडील मनोज उज्जैन विश्वकर्मा यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपी मनिष बाबासाहेब पवार, ठेकेदार जयराम बबनराव कांबळे व वसंत कैलास बनसोडे यांना अटक केली आहे.
एका आरोपीचे पवनानगर-सांगवी येथे नवीन इमारतीचे बांधकाम सुरु होते. तेथे जमिनीमध्ये असलेली पाण्याची टाकी त्यांनी बेफिकीरीने उघडी ठेवली. या पाण्याचे टाकीला कोणतेही झाकण किंवा सुरक्षित उपाय योजना केलेली नव्हती. फिर्यादी मनोज यांची साडेतीन वर्षाची मुलगी प्रियंका ही या टाकीत पडली आणि तिचा मृत्यू झाला आहे. आरोपींविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०५, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.