पुढील दोन-तीन दिवस हवामान स्थिर राहणार, वेधशाळेची माहिती
पिंपरी, ता. २१ - शहर आणि परिसरात गुरुवारी (ता. १९) १८.४ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले. भारतीय हवामानशास्त्र विभागाने शुक्रवारी (ता. २०) पुणे शहरातील किमान तापमानात एक अंश सेल्सिअसने घट नोंदवली आहे आणि पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहणार असून, त्यानंतर पुन्हा किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता सांगितले आहे.
शुक्रवारी पुणे शहरातील किमान तापमान १७.५ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस इतके राहिले. तापमानात चढ-उतार होऊन उकाडा कायम आहे. पुढील दोन ते तीन दिवस हवामान स्थिर राहणार असून, त्यानंतर मात्र त्यामध्ये पुन्हा हळूहळू वाढ होणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहून सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे.
रविवारपासून (ता. २२) कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस असू शकेल, असे हवामानशास्त्र विभागाने सांगितले.