news
clock
महिलेचा गळा आवळून खून, ३२ वर्षीय आरोपी अटकेत

महिलेचा गळा आवळून खून, ३२ वर्षीय आरोपी अटकेत

महिलेचा गळा आवळून खून, ३२ वर्षीय आरोपी अटकेत

पिंपरी, ता. २२ - कोणत्यातरी कारणावरुन ओळखीच्या महिलेचा खून केल्याची घटना शुक्रवारी (ता. २०) आळंदी पोलिस स्टेशन हद्दीतील सोळू गावातील जंगलात घडली आहे. खून करुन आरोपीने महिलेचा मृतदेह झाडाला टांगून तिने आत्महत्या केल्याचा बनाव करुन घटनस्थळावरुन पळ काढला. विष्णू महादेव पावडे (वय ३२ वर्षे रा.  ता. खेड) असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिला (वय ३० वर्षे) व आरोपी विष्णु महादवे पावडे  हे ऐकमेकांचे चांगले ओळखीचे होते. शुक्रवारी (ता. २०) ते दोघे कामानिमित्त एकत्र मोटार सायकलवर निघाले. आरोपीने सोळू येथील डोंगरावरील जंगलामध्ये महिलेला नेऊन कोणत्या तरी अज्ञात कारणावरुन मयत पार्वती दराडे हिचा कश्याच्या तरी सहाय्याने गळा आवळून खून केला.  गुन्हा लपविण्यासाठी महिलेने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. त्यासाठी महिलेचा मृतदेह जंगलातील एका झाडाला टांगला, तिने स्कार्फ बांधून आत्महत्या केली आहे असे चित्र निर्माण केले आणि हा आरोपी घटनस्थळावरुन फरार झाला. 

पोलिसांनी शोध घेवून त्याला अटक केली आहे. भारतीय न्याय संहिता - २०२३ च्या कलम १०३ (१), २३८ (क) (अ) प्रमाणे आरोपीवर आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories