news
clock
महिला व बाल विकास विभागाची पुनर्रचना होणार, असंख्य नवीन पदांसाठी होणार भरती,  महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती

महिला व बाल विकास विभागाची पुनर्रचना होणार, असंख्य नवीन पदांसाठी होणार भरती, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती

महिला व बाल विकास विभागाची पुनर्रचना होणार, असंख्य नवीन पदांसाठी होणार भरती,  महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती

पुणे, ता. ११ - शासनाच्या महिला व बाल विकास विभागाची तब्बल २३ वर्षांनंतर म्हणजे सन २००३ नंतर पुनर्रचना होणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी शनिवारी (ता. ११) समाजमाध्यमांवर दिली आहे. महिला व बाल विकास विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध ११ मार्च २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला होता. याबाबतचा शासन निर्णय आज (शनिवारी) जारी करण्यात आला आहे.  तब्बल २३ वर्षांनंतर विभागाच्या रचनेत हा मोठा बदल करण्यात आला असून, या ऐतिहासिक निर्णयामुळे विभागाच्या कामकाजास मोठी गती मिळणार आहे, असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.

महिला व बाल विकास विभागाच्या पुनर्रचनेच्या निर्णयाबाबत अधिक माहिती तटकरे यांनी दिली आहे. महिला व बाल विकास विभागाच्या बदलत्या गरजा लक्षात घेता, उच्चस्तरीय समितीने प्रस्तावित केलेल्या १६५ नवीन पदांना मंजुरी देण्यात आली आहे,  विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयांतील गट-अ ते गट-ड मधील एकूण ८६६९ नियमित पदे , २८४३ बाह्यस्त्रोत पदे तसेच, १,१०,६६४ अंगणवाडी सेविका व १,१०६६४ अंगणवाडी मदतनीस अशा एकूण २,२१,३२८ मानधनी पदांना मान्यता दिली आहे,  महाराष्ट्र समाज कल्याण बोर्ड, मुंबई येथील १५ कार्यरत आणि ३२ प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांचे आता आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांच्या अधिनस्त रिक्त पदांवर समकक्ष वेतनात समायोजन केले जाणार आहे.

योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल..

''सन २००३ पासून प्रलंबित असलेला हा विषय मार्गी लागल्यामुळे विभागाच्या कामकाजाला अधिक गती मिळणार आहे. तसेच, ग्रामीण व शहरी भागातील महिला व बालकांसाठीच्या शासकीय योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल हा मला विश्वास आहे. या माध्यमातून विभागातील महासुधारणा टीमचा एक भाग होता आले याचा मला आनंद व अभिमान वाटतो. या सुधारणा समाजातील गरजू, वंचित घटकांसाठी सदैव फलदायी व उपयुक्त ठरतील हा मला विश्वास आहे.'' - महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे







Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories